
चिंदर आचरा येथील माळरानावर अचानक मोठी आग लागली. सोसाट्याचा वारा असल्याने ही आग भडकत जाऊन चिंदर आचरा माळरानावर पसरली. आगीने रौद्ररुप धारण केल्याने ग्रामस्थांची मोठी धावपळ झाली. आगीत शेतकऱ्यांची आंबा काजूची कलमांच्या बागा भक्ष्यस्थानी पडल्या. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग लागल्याचे समजताच आचरा चिंदर ग्रामस्थ, आचरा पोलीस दाखल झाले. उशिरा आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
दुपारी 12 वा. च्या सुमारास चिंदर आचरा माळरानावर अचानकपणे आग लागली. जोरदार वाऱ्यामुळे आणि वाढलेल्या सुक्या गवतामुळे आगीने रौद्ररुप धारण केले. आग चिंदर आचरा माळरानावर पसरत चालली होती. या आगीत प्राथमिक माहितीनुसार नामदेव पांगे, मायकल फर्नाडिस, दत्ताराम मिराशी, बाबाजी गांवकर, अमित गावकर यांचा आंबाकलम बागा तसेच काजूच्या बागा जळून खाक झाल्या आहेत.
चिंदर आचरा येथील स्थानिक ग्रामस्थ आचरा पोलीस यांनी जीव धोक्यात घालून मिळेल त्या साधनाने आग विझवत आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न चालू केले. आग आटोक्यात आणण्यासाठी डॉ. राजेश भोसले, आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे, पोलीस कॉन्स्टेबल विनायक साटम, सुशांत पुरळकर, अनिकेत सावंत, आचरा येथील ग्रामस्थ दिनेश कांबळी, गणेश शामरा, सुनील पवार तसेच चिंदर येथील ग्रामस्थ समीर लब्दे संतोष चव्हाण, विकास गावडे, दत्तात्रय जाधव, किशोर कांबळी,शानु गावडे,भरत वराडकर ,बाबू खरात तसेच आचरा पत्रकार, अन्य ग्रामस्थांनीही आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत 4 तासांनी आगीवर नियंत्रण मिळवले.































































