ताडोबात दिसला काळ्या रंगाचा दुर्मिळ बिबट्या, पाहा व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ताडोबाच्या कोळसा परिक्षेत्रात गेल्या तीन वर्षांपासून काळा बिबट्या वास्तव्यास आहे. हा बिबट्या इथं आणला तेव्हापासून त्याचं पर्यटकांना भारी आकर्षण. पण त्याचं दिसणं फार दुर्मिळ आहे. मोठमोठे सेलिब्रेटी त्याला बघण्यासाठी इथं हजेरी लावून गेले. मात्र हा बिबट्या काही दिसला नाही.

दोन दिवसांपूर्वी अमरावती येथील प्रसिद्ध फोटोग्राफर अनुराग गावंडे यांनी इथं भेट दिली आणि आश्चर्य म्हणजे त्यांना काळा बिबट्या मनसोक्त बघायला मिळाला. रस्ता ओलांडताना त्याची ऐटदार चाल त्यांनी घेतलेल्या व्हीडिओत बघायला मिळते.