
खडकी परिसरातील एका चर्चमधून चोरट्यांनी दानपेटीच चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना 10 ते 11 फेब्रुवारी दरम्यान घडली आहे. जेसू अॅन्थोनी (वय 68, रा. खडकी) यांनी याबाबतची तक्रार दिली आहे.
खडकी परिसरात असलेल्या चर्चमधून चोरट्यांनी दानपेटी पळवून नेल्याचे जेसू यांना गुरुवारी सकाळी आढळले. त्यानंतर त्यांनी खडकी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. चर्चच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करून चोरट्यांनी दानपेटीतील 3 हजारांची रोकड आणि दानपेटी असा 4 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पोलीस हवालदार हनुमंत जाधव तपास करीत आहेत.
























































