कोल्हापुरी चपलांना लखनवी साज, दोन बहिणींनी 300 रुपयांत सुरू केला व्यवसाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील कोल्हापुरी चपलांना बाजारात मोठी मागणी आहे. हे लक्षात घेऊन कोल्हापुरी चपलांना डिझायनर लुक देऊन त्यांची विक्री करण्याचा लखनौच्या दोन तरुणींचा फंडा यशस्वी झाला आहे. नाजिश आणि इन्शा अशी दोघींची नावं असून त्यांनी अवघ्या 300 रुपयांच्या सँडलपासून त्यांनी स्वतŠच्या व्यवसाय सुरू केला होता. आज त्या चपलांच्या व्यवसायातून महिन्याला लाखोंची कमाई करत आहेत.

27 वर्षीय नाजिश सांगते, आम्ही आधीपासूनच घरामध्ये चप्पल आणि सँडेल्स तयार करायचो. आम्ही स्वतःच्या मनाप्रमाणे डिझाइन केलेल्या चपल्या आजूबाजूच्या लोकांना आवडायच्या. मग याचाच व्यवसाय करावा, हा विचार मनात आला. आम्ही कोल्हापुरी सँडेल्सवर क्रिएटिव्ह डिझाइन तयार करण्याचे काम सुरू केले कारण आपल्याकडे कोल्हापुरी चप्पल आणि सँडेल्सला चांगली मागणी आहे. मी आणि माझी छोटी बहीण इंशाने या कामाला सुरुवात केली.’

नाजिशसोबत अन्य चार जण काम करतात. अभिनेत्री विद्या बालन, सारा अली खान, परिणीती चोप्रा यांच्यासारख्या सेलिब्रेटीदेखील नाजिश- इन्शाच्या चपला वापरतात.

कोल्हापुरी चपलांची वाढती मागणी पाहता नाजिश या चपलांवर डिझाइन तयार करू लागली. ती मार्पेटमधून कोल्हापुरी चपला खरेदी करुन आणते. डिझाइनचे सँपल तयार करते आणि त्यानुसार क्रिएटिव्ह काम करते. फॅशन आणि ट्रेंडनुसार तिचे काम चालते. दोन्ही बहिणींनी आतापर्यंत 15 हजारांपेक्षा जास्त डिझाइन तयार केले आहेत.