माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत (91) यांचे पुण्यात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

रत्नागिरीत जन्मलेल्या पी.बी. सावंत यांचे विधी शाखेचे शिक्षण मुंबई येथील सिद्धार्थ लॉ कॉलेजमध्ये पूर्ण झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबईत वकिलीला सुरुवात केली. 1988 ते 1995 या कालावधीत ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होते. त्याचप्रमाणे ते प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सहा वर्षे अध्यक्ष होते. निवृत्तीनंतर ते समाजकारणात सक्रिय झाले होते. ते एल्गार परिषदेचे अध्यक्ष होते. समाजकारण, राजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचा मोठा जनसंपर्क होता. साकंत यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. पी.बी. सावंत यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात येत असून एक आदरणीय व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली आहे. ते देश बचाव आघाडी आणि लोकशासन आंदोलन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष होते. माहिती अधिकार कायद्याचे शिल्पकार म्हणून त्यांची ओळख होती.

पी.बी. सावंत यांचे जाणे ही दुŠखद वार्ता आहे. आपल्या स्पष्ट परखड आणि सडेतोड भूमिकेमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले. सर्कसामान्यांना कायद्याचे विधायक अधिष्ठान नेहमीच मिळाले पाहिजे यासाठी ते सदैव आग्रही होते. कायद्याचे पावित्र्य अबाधित रहावे यासाठी ते अखेरपर्यंत कार्यरत राहिले. विधायक कार्य करणाऱया प्रत्येक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे ते मार्गदर्शन, मेंटौर नव्हे तर सर्वसामान्य माणसांना बापाचा आधार देणारा ‘बाप’ माणूस आपण गमावला आहे, अशा भावना ऍड. विजय सावंत यांनी व्यक्त केल्या.