श्लोक ऐकवा अन् पेट्रोल जिंका!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेट्रोल आणि डिझेलचे दिवसेंदिवस वाढणारे भाव सर्वसामान्यांची चिंता वाढवत आहेत. अशातच दक्षिण हिंदुस्थानातील एका पेट्रोलपंपचालकाने ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफर आणली आहे. ऑफर अंतर्गत मुलांनी तमीळ शास्त्रीय ग्रंथ तिरुक्कुरलमधील 20 श्लोक ऐकवल्यास 1 लीटर तर 10 श्लोक ऐकवल्यास अर्धा लीटर पेट्रोल मोफत देण्यात येईल. तिरूवल्लकुर दिवसानिमित्त पेट्रोल पंप मालकाने जाहीर केलेल्या या ऑफरची सध्या सर्वत्र चर्चा आहे. विद्यार्थ्यांना शास्त्रीय ग्रंथ तिरूवल्लकुर वाचण्यासाठी प्रोत्साहित करणे हा ऑफरमागचा मालकाचा हेतू आहे.