पेण – भाजपला दे धक्का, शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेत इन्कमिंग जोरात सुरू असून मागच्याच आठवड्यात पेण तालुक्यातील मनसेच्या पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असतानाच आता भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनीही माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

पेण पंचायत समितीचे माजी सदस्य आनंत पाटील यांच्यासह ग्रुप ग्रामपंचायत शिर्कीचे माजी सदस्य आत्माराम गावंड, भाल येथील विनोद म्हात्रे, वाशी येथील राजा म्हात्रे, संतोष म्हात्रे, प्रशांत पाटील, जगदीश थवई, प्रमोद पाटील, संदीप पाटील, विजय पाटील, जनार्दन मढवी, आनंद पाटील, अंकित पाटील, भरत पाटील व पांडुरंग माळी यांनी माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला शिवसेनेचे तालुकाप्रमुख अविनाश म्हात्रे, ग्राहक संरक्षणाचे नंदू मोकल, कासु विभाग प्रमुख गजानन मोकल, माजी शहर प्रमुख अशोक वर्तक, राजा पाटील, कल्पना पाटील, प्रशांत पाटील आदी शिवसैनिक उपस्थित होते.