चौकशीतून सत्य बाहेर येईल, बदनामी थांबवा; वनमंत्री संजय राठोड यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अतिशय घाणेरडे राजकारण केले जात असून ते चुकीचे आणि निराधार आहे. गेल्या 30 वर्षांची माझी सामाजिक आणि राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा वाईट प्रकार सुरू आहे. जे काही दाखवले त्यात काहीही तथ्य नाही. या प्रकरणाच्या चौकशीतून सत्य बाहेर येईल. तोपर्यंत माझ्या समाजाची, माझी बदनामी करू नका असे आवाहन वनमंत्री संजय राठोड यांनी पत्रकार परिषदेत केले.

सोशल मीडिया स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधकांकडून वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप होत आहेत. त्यामुळे वादात सापडलेले राठोड पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले. मंगळवारी त्यांनी पोहरादेवी येथे सहकुटुंब जगदंबा माता, सेवालाल महाराज आणि पोहरादेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पोहरादेवी गडाकर पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली.

पूजा चव्हाणच्या मृत्यूबद्दल संपूर्ण गोर बंजारा समाज दु:खी आहे. चव्हाण कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. मात्र या प्रकरणात घाणेरडे राजकारण केले जात आहे. समाजमाध्यम आणि प्रसारमाध्यमांतून जे दाखवण्यात आलंय त्यात तथ्य नाही हे मी खात्रीने सांगू शकतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीतून सर्व स्पष्टच होईल, असे राठोड म्हणाले.

सामाजिक दबावातून गुन्हा दडपण्याचा प्रयत्न – आशीष शेलार

वनमंत्री संजय राठोड यांचा सार्वजनिक जाहीर कार्यक्रम होतोच कसा? त्याला परवानगी कशी मिळते? आतापर्यंत या प्रकरणाच्या चौकशीत राजकीय दबाव होता. मात्र आता सामाजिक दबाव वाढवून गुन्हा दडपण्याचा प्रयत्न होताना दिसतोय, अशी टीका भाजप नेते आमदार आशीष शेलार यांनी केली आहे.

पूजा चव्हाण प्रकरण गायब नक्हतो

मी कुठेही गायब नव्हतो. मुंबईतील फ्लॅटकरून शासकीय काम करत होतो. आजपासून पुन्हा पूर्वीप्रमाणे काम करणार आहे. सर्वांना सोबत घेऊन मी आतापर्यंत काम केले. अनेक लोक माझ्यासोबत फोटो काढतात. एका घटनेमुळे तुम्ही मला चुकीचे ठरवू नका. चौकशीमधून सर्क सत्य बाहेर येईल, आपण विश्वास ठेवावा, असे वनमंत्री संजय राठोड म्हणाले.