सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 मार्चपर्यंत पुढे ढकलल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दररोज वाढते आहे. अनेक जिह्यांमध्ये लॉकडाउनदेखील घोषित करण्यात आला असून काही निर्बंध देखील लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आज राज्यातील सहकारी संस्थांच्या सध्या सुरू असलेल्या निवडणुका सध्या ज्या टप्प्यावर आहेत त्याच टप्प्यावर 31 मार्चपर्यंत पुढे करण्यात आल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षभरात पाचव्यांदा या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुका निवडणूका कोरोना विषयक नियमावलीचे काटेकोर पालन करून घेतल्या जातील परंतुसध्या सुरू असलेली राज्यातील 3213 सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया प्रक्रिया आज सायंकाळी होती त्याच ठिकाणी थांबवण्यात येणार आहे. राज्याच्या सहकार विभागाने या निवडणुकांत संदर्भात आज आदेश जारी केले.

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा एकदा ब्रेक लागण्याची शक्यता वर्तविली जात होती अखेर शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

  • आतापर्यंत पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली. सहकार निवडणूक प्राधिकरणाकडून 31 डिसेंबर 2020 अखेर अ, ब, क, ड या वर्गीकरणाच्या एकूण निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्थांची संख्या 44 हजार 613 इतकी निश्चित केली.
  • पहिल्या टप्प्यामध्ये यापूर्वीच निवडणूक प्रक्रिया सुरु झालेल्या परंतु कोविडमुळे प्रक्रिया थांबविण्यात आलेल्या 3 हजार 213 सहकारी संस्थाचा समावेश आहे. या टप्प्यातील निवडणुका निवडणूक प्रकिया सुरु सध्या सुरू होती ती देखील आज थांबवण्यात आली आहे.