
एमटीएआर टेक्नोलॉजीज ही हैदराबादमधील प्रिसिजन इंजिनीअरिंग सोल्युशन्स कंपनी आहे. ही कंपनी क्लीन एनर्जी, अणु आणि अवकाश व संरक्षण क्षेत्रामधील मिशनसाठी महत्वाच्या प्रिसीजन भागांसाठी आणि असेंब्लीच्या निर्मितीत कार्यरत आहे. 3 मार्च रोजी या कंपनीचा आयपीओ खुला होणार असून 5 मार्च रोजी समाप्त होईल. प्रति इक्विटी शेअरसाठी 574 ते 575 हा प्राइस बँड आहे. कंपनी आणि विक्रेते समभागधारक बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने अँकर इन्क्हेस्टर्सच्या सहभागाविषयी विचार करू शकतात, जे एक दिवस आधी म्हणजेच 2 मार्चला असेल.
































































