रिक्षासह चार दुचाकी वाहनांना धडक देत कापड दुकानाच्या पार्किंगमध्ये घुसली कार; तीनजण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

औसा शहरातील जलाल शाही ते मेन रोडमार्गे जामा मशीदजवळ भरधाव कार रिक्षासह चार दुचाकींना धडकत पार्किंगमध्ये घुसली आहे. लातूर येथील युवकाने स्विफ्ट डिझायर कार भरधाव चालवत एका रिक्षासह चार दुचाकी वाहने चिरडल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली आहे. या दुर्घटनेत तीनजण गंभीर जखमी झाले आहेत.

लातूर येथील राजू विष्णू उबाळे (वय 27, रा. प्रकाश नगर लातूर) हा स्विफ्ट डिझायर कार भरधाव चालवत मुख्य बाजारपेठेतील मेन रोडवर आला. तिथे एक रिक्षासह चार दुचाकी वाहनांना त्याने धडक दिली. त्यानंतर कार थेट डाव्या बाजूस असणाऱ्या कापड दुकानाच्या पार्किंगमध्ये घुसवली. याप्रकरणी औसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेत राजा महंमदसाब बागवान (वय 38), रईसा राजा बागवान (वय 32), तानाजी भास्कर दळवे (वय 27) जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.