वीज बिल थकबाकीदारांवर आजपासून कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरणकडून केल्या जाणाऱया कारवाईला दिलेली स्थगिती सरकारने मागे घेतल्यानंतर आता पुन्हा वीज कर्मचारी कारवाईसाठी सज्ज झाले आहेत. भांडुप परिमंडळातील लघु आणि उच्चदाब वीज ग्राहकांकडे तब्बल 1 हजार 68 कोटी रुपये थकीत आहेत. त्याच्या वसुलीसाठी उद्या शनिवारपासून धडक कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्य अभियंत्यांनी दिला आहे.

भांडुप परिमंडळात 25 लाख वीज ग्राहक जवळपास दहा लाखांहून अधिक वीज ग्राहकांचा थकबाकीदारांमध्ये समावेश आहे. महावितरणच्या एकूणच वीज बिल थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस फुगत चालला आहे. त्यामध्ये भांडुप परिमंडळाचाही समावेश आहे. सरकारने वीज बिल थकबाकीदारांवरील कारवाईला स्थगिती देण्याआधी वसुली पथकाने धडक करावाई करत जवळपास 10 हजारहून अधिक ग्राहकांवर कारवाई करत वीज कापली होती, मात्र सरकारने सदर कारवाईला स्थगिती दिल्याने वसुली मोहीम थंडावली होती. त्यानंतर आता सरकारने वीज बिल वसुलीच्या कारवाईवरील स्थगिती उठवली आहे. त्यामुळे वसुली मोहीम पुन्हा तीव्र केली जाणार असल्याचे परिमंडळाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी स्पष्ट केले आहेत. त्यामुळे महावितरणने जाहीर केलेल्या योजनांचा लाभ घेत ग्राहकांनी आपले वीज बिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन गणेशकर यांनी केले आहे.