
सोमवारी सकाळपासून जम्मू-कश्मीरच्या शोपियान भागामध्ये हिंदुस्थानी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. शोपियानच्या रावलपोरा गावामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर जम्मू-कश्मीर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफ यांनी संयुक्तपणे या दहशतवाद्यांविरोधात मोहीम उघडली.
यावेळी झालेल्या चकमकीमध्ये जैश-ए-मोहम्मदचा जम्मू-कश्मीरमधील कमांडर सज्जाद अफगाणी याचा खात्मा करण्यात हिंदुस्थानी फौजांना यश आले आहे. सज्जाद जैशसाठी नव्या तरुणांना भरती करून त्यांना प्रशिक्षण देण्याच्या यंत्रणेत सहभागी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

























































