
कोरोना झाला असतानाही चित्रपटाच्या चित्रीकरणात भाग घेतल्याप्रकरणी अभिनेत्री गौहर खान हिच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्वारंटाईनचे उल्लंघन केल्याप्रकरणी पहिल्यांदाच एका अभिनेत्रीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांनी क्वारंटाईनचे नियम पाळावेत, नाही तर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून त्या पार्श्वभूमीवर, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने कठोर कारवाई करायला सुरुवात केली असून क्वारंटाईनचे नियम मोडणाऱयांविरोधात पालिकेकडून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. ओशिवऱयात राहणाऱया गौहर खान हिने कोरोना चाचणी केल्यानंतर 11 मार्चला तिला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तिने घरातच विलगीकरणात राहणे बंधनकारक होते.
मात्र, तिने सार्वजनिक ठिकाणी जात चित्रीकरणातही भाग घेतल्याचे आरोग्य कर्मचाऱयांना आढळले. याची खान हिच्या घरी जाऊन शहानिशा करण्यात आली. त्यानंतर त्यामुळे क्वारंटाईनचे नियम मोडल्याप्रकरणी पालिकेच्या ‘के-पश्चिम’ विभागाच्या आरोग्य खात्यातील अधिकाऱयांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात कलम 188, 269, 270 आणि साथरोग नियंत्रण कायद्याच्या कलम 2 व 3 नुसार तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.






























































