व्हिडीओ गेमचा नादखुळा! हिंदुस्थानी साडेआठ तास मोबाईलवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉक डाऊनमुळे गेल्या वर्षभरात जगभरात व्हिडीओ गेम खेळणाऱयांचे प्रमाण  वाढले आहे. कित्येकांनी तर लॉक डाऊनमध्येच व्हिडीओ गेम्स खेळायला सुरुवात केली. यामध्ये हिंदुस्थानीही काही मागे नाहीत. ते दरआठवडय़ाचे साडेआठ तास व्हिडीओ गेम खेळण्यात घालवत आहेत. 60 टक्क्यांहून अधिक हिंदुस्थानी तर सलग तीन तास गेम खेळत असल्याचे निरीक्षण आहे.

लाईमलाईट नेटवर्क कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क सर्विस कंपनीने यासंदर्भातील अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार जगभरातील गेमर्स आठवडय़ाला सरासरी 8 तास 27 मिनिटे एवढा अवधी व्हिडीओ गेम्स खेळतात. लोक घरात अडकून पडल्याने मनोरंजनासाठी ते व्हिडीओ गेमकडे वळल्याचे 64 टक्के लोकांनी सांगितले. त्यामुळे कंझ्युमर प्लेईंग टाईम गेल्या वर्षीपेक्षा 14 टक्क्यांनी वाढले.   हिंदुस्थानात बिंग गेमिंग हा व्हिडीओ गेम खेळण्याचा कालावधी सरासरी 4.1 तासांवरून 5.5 तास एवढा वाढल्याचे अहवालातून दिसून आले आहे.