आधी पुशअप्स, मग सेल्फी! मिलिंद सोमणने चाहत्यांना घातली अट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता मिलिंद सोमणचे फॅन असाल आणि त्याच्यासोबत सेल्फी काढायची असेल तर तुम्हाला आधी 20 पुशअप्स मारावे लागतील. होय, मिलिंदनेच आपल्या चाहत्यांना ही आगळीवेगळी अट घातली आहे.

सोशल मीडियावर मिलिंदने आपल्या एका चाहत्यासोबतचा सेल्फी पोस्ट केला आहे. त्यात त्याचा चाहता पुशअप्स मारताना दिसतोय. पोस्टमध्ये मिलिंदने म्हटलंय, ‘सेल्फी काढायचा असेल तर पुशअप्स मारावे लागतील. 20 मुलांसाठी आणि 10 मुलींसाठी. कारण माझी आई वयाच्या 82 व्या वर्षी 20 पुशअप्स मारते.

हे पाहून छान वाटले की जवळजवळ 90 टक्के लोक हे करण्यास तयार झाले. काहींनी ते पहिल्यांदा केले तर काहींनी विमानतळ, हॉटेल, महामार्गावर देखील केले. जी गोष्टी तुमच्या चांगल्यासाठी असते ती करायला कधी नाही म्हणू नका.’