
आंध्र प्रदेशमध्ये ट्रक आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. या अपघात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 6 जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Andhra Pradesh: Eight dead and six injured after a tempo and lorry collided with each other near Damaramadugu village in Nellore district, earlier today.
— ANI (@ANI) March 28, 2021
आंध्र प्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यात एक टेम्पो आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या ट्रकमध्ये 15 प्रवासी होती. सर्व नेल्लोरला जात होते तेव्हा हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की त्यात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये 5 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. या अपघातात 6 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
























































