मिचेल मार्शऐवजी जेसन रॉयची एण्ट्री, आयपीएलच्या यंदाच्या मोसमात हैदराबादसाठी खेळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श याने वैयक्तिक कारण पुढे करीत यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतली. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद संघाने त्याच्याऐवजी इंग्लंडचा सलामी फलंदाज जेसन रॉयला संघात घेतले.

मिचेल मार्शला आयपीएलच्या गेल्या मोसमात दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. याही वर्षी तो या स्पर्धेत खेळणार नाहीए. सनरायझर्स हैदराबादने जेसन रॉयला दोन कोटींच्या बेस प्राइजवर संघात समाविष्ट करून घेतले.

जेसन रॉय 2017 साली पहिल्यांदा आयपीएलमध्ये खेळला. त्याने आतापर्यंत गुजरात लायन्स व दिल्ली डेअरडेव्हिल्स या दोन संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. जेसन रॉयने आठ सामन्यांमध्ये एक अर्धशतकांसह 179 धावा फटकावल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या हिंदुस्थानविरुद्धच्या मालिकेतही त्याने आपला ठसा उमटवला होता.