
गृहकर्ज (होम लोन) देणारी कंपनी एचडीएफसी लि.ने विशिष्ट काळासाठीच्या फिक्स डिपॉझिटसाठीच्या (FD) व्याज दरात वाढ करून ग्राहकांना दिलासा दिला आहे. एचडीएफसीने फिक्स डिपॉझिटच्या व्याज दरात 0.25 टक्के वाढ केली. नवे व्याज दर हे 30 मार्च पासून लागू असतील. अन्य बँका व्याजदरात घट करत असताना एचडीएफसी लि. ने हे पाऊल उचललं आहे.
आता इतकं झालं व्याज
एचडीएफसीच्यानुसार 33 महिन्यांच्या मॅच्युरिटीसाठी 2 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवर वर्षासाठी 6.20 टक्के इतका व्याज दर असेल. तर 66 महिन्यासाठीच्या फिक्स्ड डिपॉझिटवर 6.60 टक्के व्याज मिळेल. एचडीएफसीच्यानुसार 99 महिन्यांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर 6.65 टक्के इतका व्याजदर ठेवण्यात आला आहे.
ही कॉरपोरेट एफडी आहे
महत्त्वाचे म्हणजे ही योजना एचडीएफसी बँकेसाठी नाही तर होम लोन देणारी कंपनी एचडीएफसी लि. साठीचा एफडीचा दर आहे. हे कॉरपोरेट एफडीच्या कक्षेत येतं. कॉरपोरेट एफडीवर रिटर्न चांगले मिळतात, मात्र यामध्ये अन्य बँकांच्या तुलनेत जोखिम अधिक असते.
एचडीएफसीकडे सलग 25 वर्षांपासून क्रिसिल आणि आयसीआरए दोघांचे AAA रेटिंग आहेत. एफडीमध्ये निवड करण्यासाठी वेगवेगळे पर्याय आहेत. मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक आणि वार्षिक असे पर्याय आहेत. कॉरपोरेट फिक्स्ड डिपॉजिट डीआयसीजीसी वीमाद्वारे कव्हर केले जात नाहीत, तर अन्य बँकांमधील एफडीमध्ये 5 लाख रुपयांपर्यंत वीमा कव्हर मिळते.
अन्य छोट्या बचत योजनांवर देखील चांगले रिटर्न मिळतात. सरकारने पहिलेच छोट्या बचत योजनांवर व्याज दर कमी करण्याचा निर्णय घोषित केला होता. मात्र, नजर चूक म्हणत गुरुवारी तो तो निर्णय मागे घेतला.




























































