तब्बल 30 वर्षांनी कापली नखं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील सर्वात लांब नखं म्हणून गिनीज बुकात नोंद असलेल्या अमेरिकेतील अयाना विलियम्स या महिलेने तब्बल 30 वर्षांनी आपली नखं कापली आहेत. त्यांच्या या नखांची लांबी थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 733.5 सेंटिमीटर म्हणजेच 24 फूट इतकी होती. टेक्सास येथील डॉक्टर एलिसन रेडिंगर यांनी इलेक्ट्रिक रोटरी टूलच्या मदतीने ही नखं कापली आहेत.

अयाना यांचे आपल्या नखांवर विशेष प्रेम आहे. 2017 साली पहिल्यांदा त्यांच्या लांब नखांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती. त्यावेळी त्यांच्या नखांची लांबी 19 फूट इतकी होती. नखांसाठी त्यांनी एकाचवेळी दोन नेलपेंटच्या बाटल्या लागायच्या. तर मेनिक्योरसाठी 20 तास लागायचे. अयानाच्या कापलेल्या नखांचं जतन आता रिपले येथील ’बिलिव्ह इट ऑर नॉट’ या संग्रहालयात केले जाणार आहे. हे म्युझियम ओरलेंडो, फ्लोरिडा येथे आहे.