सुट्टीवर आलेल्या जवानाची दहशतवाद्यांकडून गोळ्या घालून हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरमध्ये एका जवानाची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. हा जवान सुटीमध्ये घरी आला होता.

मोहम्मद सलीम अखून हे सुटीवर घरी आले होते. शुक्रवारी जबीलपोरात भागात दोन दहशतवाद्यांनी अखून यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दोन्ही दहशतवादी लश्कर ए तोयबाचे असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मोहम्मद सलीम अखून यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, 6 वर्षाचा मुलगा आणि 9 वर्षाची मुलगी असा परिवार आहे.