देशात कोरोनाचा कहर सुरूच, 24 तासांत आढळले दीड लाखहून अधिक रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोनाचे संकट कमी होताना दिसत नाहिये. गेल्या 24 तासांत देशात दीड लाखहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळली आहेत. तसेच मृत्यूंच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.

देशात गेल्या 24 तासात 1 लाख 52 हजार 879 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या 1 कोटी 33 लाख 58 हजार 805 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात 90 हजार 584 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आतापर्यंत 1 कोटी 20 लाख 81 हजार 443 रुग्ण कोरोनामुक्त झाले अहेत. गेल्या 24 तासात 839 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 1 लाख 69 हजार 275 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 10 कोटी 15 लाख 95 हजार 147 नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. सध्या देशात 11 लाख 8 हजार 275 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.