
कोरोना रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू झाल्यानंतर 7 दिवसांनी त्यांच्या पुन्हा कोरोना चाचण्या करण्यात येतात. मात्र, 7 दिवसांनंतरही ज्या रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली पण लक्षणे कमी झाली आहेत, अशा रुग्णांवर त्याच खासगी रुग्णालयात उपचार न करता त्यांच्यावर पुढील उपचार पंचतारांकित हॉटेल्समध्ये केले जाणार आहेत.
त्यासाठी 600 बेडची व्यवस्था केली जाणार आहे. ही हॉटेल्स खासगी रुग्णालयांशी जोडली जाणार आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये रिक्त होणारे 600 बेड नवीन कोरोना रुग्णांसाठी वापरता येणार आहेत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.



























































