कात्रजमध्ये घरात शिरून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

घरामध्ये शिरून एका तरूणाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कात्रजमधील सुखसागरनगर परिसरात काल घडली आहे. अक्षय साबळे (रा. दत्तनगर, कात्रज) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी अक्षयची ओळख होती. त्याचा गैरफायदा घेत त्याने काल दुपारी पीडित मुलीच्या घरात कोणीही नसताना प्रवेश केला. मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलीने घटनेची माहिती तिच्या आईला दिली. आईने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस तपास करीत आहेत.