
हिंदुस्थानात जगातील सर्वात मोठे स्टेडियम आकाराला येणार आहे. हिमाचल प्रदेशमधील लाहॉल व्हॅली येथे हे स्टेडियम तयार करण्यात येणार आहे. समुद्रसपाटीपासून 10 हजार फूट उंचीवर या स्टेडियमची निर्मिती करण्यात येणार आहे. लाहॉल स्पीटी क्रिकेट असोसिएशनकडून या स्टेडियमच्या निर्मितीसाठी पुढाकार घेण्यात आला असून 2013 सालापासून यावर काम सुरू आहे. जमिनी व कागदपत्रांचा व्यवहार अंतिम टप्प्यात आला आहे.


























































