
कोरोनाच्या संकटकाळात रुग्णसेवा करणाऱया फ्रंटलाइन वर्कर्ससाठी अभिनेता सलमान खानने पुढाकार घेतला असून त्याच्या ‘भाईजान’ किचनमध्ये बनवलेल्या सुमारे 5 हजार अन्नपाकिटांचे या कोरोना योद्धय़ांना वाटप करण्यात आले आहे. या अन्नाचा दर्जा सर्वेत्तम असावा यासाठी सलमान किचनमध्ये बनवल्या जाणाऱया अन्नाकडे जातीने लक्ष देत आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी अभिनेता सोनू सूद याच्यासह बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी आपापल्या परीने पुढाकार घेतला असताना आता सलमान खाननेही आपल्या ‘भाईजान’ किचनच्या वतीने खासकरून फ्रंटलाइन वर्कर्ससाठी तयार अन्न देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात उपक्रमात ‘आय लव्ह मुंबई’ या स्वयंसेवी संस्थेचे सदस्य राहुल कनालही सहभागी झाले होते.






























































