
‘रिव्हॉल्वर दादी’ म्हणून गावात प्रसिद्ध असलेल्या चंद्रो तोमर यांना कोरोनाची लागण झाली आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये राहणा 89 वर्षीय आजींच्या ट्विटर पेजवर ही माहिती देण्यात आली आहे.
त्यांच्या ट्विटर पेजवर लिहिण्यात आलं आहे की, ‘चंद्रो तोमर आजी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. देव प्रत्येकाचे रक्षण करो.’
दादी चंद्रो तोमर कोरोना पॉज़िटिव हैं और साँस की परेशानी के चलते हॉस्पिटल में भर्ती हैं । ईश्वर सबकी रक्षा करे – परिवार
— Dadi Chandro Tomar (@realshooterdadi) April 26, 2021
ज्या वयात आरोग्याच्या समस्यांनी ग्रासून माणूस अंथरुणाला खिळलेला असतो, त्यावयात चंद्रो आजीनी वयाच्या 60 व्या वर्षी नेमबाजीची सुरुवात केली. यानंतर त्यांनी नेमबाजीच्या अनेक राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत. त्या जगातील सर्वात वयस्कर नेमबाज म्हणून प्रसिद्ध आहेत.


























































