जी-मेलचा पासवर्ड रिसेट कसा करायचा! तामिळनाडूच्या व्यक्तीने थेट सुंदर पिचाईंकडे मागितली मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जी-मेलचा पासवर्ड विसरल्यावर नवीन पासवर्ड सेट करण्यासाठी आपण स्क्रीनवर दिलेल्या सूचनांचे पालन करतो. नाहीच जमले तर त्यासाठी आपण एखाद्या मित्राची मदत घेतो. पण तामिळनाडूच्या एका पठ्ठय़ानं जी-मेल पासवर्ड रिसेट करण्यासाठी थेट गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याकडे ट्विटरवर मदत मागितली आहे.

देशातील कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सोमवारी 135 कोटींच्या रिलीफ फंडची घोषणा केली आहे. ट्विटरवर एक ब्लॉग पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली.

त्या ब्लॉगवर मधन या युजरच्या कमेंटने सगळ्यांचे लक्ष वेधलेय. या व्यक्तीने लिहिलंय, ‘‘नमस्कार सर, कसे आहात… मला तुमची थोडी मदत हवीय. मी जी-मेलचा पासवर्ड विसरलो आहे. तो रिसेट कसा करायचा?’’ मधन यांनी चक्क गुगलच्या सीईओंना हा प्रश्न विचारल्याने ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली.