लस घ्या, कोरोना टाळा! 18 वर्षे पूर्ण झालेल्या लाभार्थ्याची प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या दुसऱया लाटेत सर्वात जास्त कोरोनाचा संसर्ग हा तरुणांना झाला आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांचे सरसकट लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा हा वाढता फैलाव पाहता सर्व पात्र तरुणांनी लस घेतली पाहिजे असल्याचे मत वारेन फर्नांडिस याने व्यक्त केले. नायर रुग्णालयात 18 वर्षांवरील लसीकरण मोहिमेचा शुभारंभ वारेन याला लस देऊन करण्यात आला. मुंबईतील ज्या काही सेंटरवर या तिसऱया टप्प्यातील लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला त्यामध्ये नायर लसीकरण पेंद्राचा समावेश आहे.

लसीकरणाच्या अनुषंगाने तरुणांमध्ये मोठा उत्साह आहे. सांताक्रुझ येथील वाकोला परिसरात राहणारा वारेन हा चर्चगेट येथील एच. आर. महाविद्यालयाचा विद्यार्थी असून सीएचे शिक्षण घेत आहे. गेल्या वर्षीच ऑक्टोबर महिन्यात त्याला 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याच्या या लसीकरणाच्या अनुभवाबद्दल तो माहिती देताना तो सांगतो की, ‘जेव्हापासून तरुणांसाठी लसीकरण चालू होणार आहे हे कळल्यापासून मी आणि माझा मोठा भाऊ लस घेण्यासाठी उत्सुक होतो. त्याप्रमाणे ज्यावेळी कोविन अॅपमध्ये नोंदणी चालू झाली त्याप्रमाणे आम्ही तत्काळ दोघांनी नोंदणी केली. परंतु आम्हाला काही मेसेज आला नव्हता. आम्ही दोघेही मेसेज कधी येतोय याची वाट बघत होतो. त्याप्रमाणे आम्हाला मध्यरात्री 2 वाजता मेसेज आला. सकाळी तो आम्ही पाहिला आणि तत्काळ दिलेल्या वेळेत नायर रुग्णालयात आलो. अनेक नागरिक लस मिळावी म्हणून प्रयत्न करीत आहेत. त्यामध्ये आम्हाला ही लस मिळाली याचा विशेष आनंद आहे.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच पात्र नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी महापालिका आवश्यक ते सर्व नियोजन करीत असून नागरिकांनी लसीकरण करवून घेण्यासाठी गर्दी करू नये व कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे परिपूर्ण पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ज्यांना मेसेज आला आहे त्यांनीच लसीकरण पेंद्रावर येणे अपेक्षित आहे.

हे लसीकरण केवळ ‘कोविन अॅप’ मध्ये नोंदणी केलेल्या व्यक्तींसाठी असणार आहे. तसेच सध्या तरी लसीची केवळ पहिली मात्रा घेणाऱयांनाच या सुविधेचा लाभ दिला जाणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. लस सुरक्षित असल्याचे यापूर्वीच तज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे सगळ्यांनी लस घेतली पाहिजे आणि या आजारापासून संरक्षण मिळवले पाहिजे.