ममता जिंकल्या; आता कोरोनाकडे लक्ष देऊया – उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली झुंज देत दणदणीत विजय मिळवला. याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले. तसेच आता राजकारण संपले असेल तर सगळय़ांनी मिळून कोरोनाविरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया, अशी पुस्तीही उद्धव ठाकरे यांनी पुढे जोडली.

ममता बॅनर्जी यांना भरभरून शुभेच्छा देताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ममता बॅनर्जी या बंगाली जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या हिंमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारे ममतादीदींच्या पराभवासाठी पश्चिम बंगालच्या भूमीवर एकवटली.

या सर्व शक्तींचा पराभव करून ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये विजय मिळविला. मी त्यांचे आणि हिंमतबाज बंगाली जनतेचे मनापासून अभिनंदन करतो.