
सिंधुदुर्ग जिह्यात कोरोना रुग्णांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, सर्वपक्षीयांनी घेतलेल्या निर्णयानुसार सात दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी 9 तारखेला रात्री बारा वाजल्यापासून 15 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत करण्यात येईल, अशी घोषणा जिह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केली. दरम्यान नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी सर्वांना केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कल्पनेतून राज्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवण्यात येत आहे. त्याच धर्तीवर सिंधुदुर्ग जिह्यातही ’माझे सिंधुदुर्ग माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवण्यात येत आहे. त्यात चार दिवसांत 1 लाख लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात जिह्यात करोनाचा समूह संसर्ग होत असल्याचे आढळले. यामुळेच लॉकडाऊनचे पाऊल उचलण्यात आले असल्याचे सामंत यांनी सांगितले.
किराणा सामान, भाजीपाला, फळ विक्री दुकाने, डेअरी, बेकरी मिठाई व इतर खाद्य पदार्थांची दुकाने, चिकन, मासे, अंडी याची दुकानेही बंद राहणार.
मेडिकल दुकानांसाही दोन सत्रांत वेळा निश्चित करता येतील.
कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करून आंबा विक्री करता येईल.






















































