ऍमेझॉन देणार 75 हजार नोकऱया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. त्याचा फटका औद्योगिक क्षेत्राला बसला आहे. अनेक पंपन्या आर्थिक संकटात आहेत. अशातच जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी ‘अॅमेझॉन’ने मोठय़ा प्रमाणात नोकऱया देण्याचा निर्णय घेतला आहे. अॅमेझॉन कंपनी हिंदुस्थानसह काही देशांमध्ये 75 हजार लोकांना रोजगार देणार आहे.

अॅमेझॉनने दिलेल्या माहितीनुसार कंपनी सुमारे 75 हजार लोकांची भरती करणार आहे. वेयरहाऊस स्टाफपासून ते डिलिव्हरी ड्रायव्हरपर्यंतची ही पदे असतील. कोराना काळात लोक घरांमध्ये अडकून पडले आहेत. त्यामुळे ऑनलाईन ऑर्डरची मागणी वाढत आहे. अॅमेझॉन कंपनीने नव्या लोकांना कामाकडे आकर्षित करण्यासाठी पगारवाढीची योजना तयार केली आहे.

प्रतितास 15 डॉलर किमान वेतन वाढवून 17 डॉलर करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व कर्मचाऱयांच्या आरोग्याची योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याने पंपनीने स्पष्ट केले आहे.