देऊळ बंद’ चे दिग्दर्शक प्रणित कुलकर्णी यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी चित्रपटसृष्टीतील संवेदनशील लेखक, गीतकार आणि दिग्दर्शक प्रणित कुलकर्णी यांचे सोमवारी दीर्घ आजाराने पुण्यात निधन झाले आहे. लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियाकरून प्रणित यांच्या निधनाची बातमी दिली आहे. फिरोदिया करंडक स्पर्धा गाजवून प्रणित कुलकर्णी यांचा कलाक्षेत्रातील प्रवास सुरू झाला. मराठीत गाजलेल्या ‘देऊळबंद’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रणित कुलकर्णी यांनी प्रवीण तरडे यांच्यासोबत केले होते. ‘मुळशी पॅटर्न’, ‘देऊळबंद’, ‘सरसेनापती हंबीरराक’ या चित्रपटांसाठी त्यांनी ‘आरारारा खतरनाक’, ‘उन उन कठातून’, ’आभाळा आभाळा’, ‘हंबीर तू खंबीर तू’, ‘गुरुचरित्राचे कर पारायण’ अशा एकापेक्षा एक सरस गाण्यांचे लिखाण केले होते. ‘माझा प्रणितदादा गेला. सरस्वती प्रसन्न असलेला शब्दप्रभू हरपला,’ अशा शब्दांत तरडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.