
बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याचा ‘सीआययू’ युनीट मधला सहकारी तसेच अॅण्टेलिया स्पह्टक आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणात एनआयएने अटकेची कारवाई केलेला निलंबित एपीआय रियाझ काझी याला देखील आज सेवेतून बडतर्फ करण्यात आले. अॅण्टेलिया स्पह्टक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे याला एनआयएकडून अटक झाल्यानंतर वाझेचा सीआययु मधील खास अधिकारी एपीआय रियाझ काझी हा देखील एनआयएच्या चौकशीच्या फेऱयात सापडला होता. बरेच दिवसांच्या चौकशीनंतर काझीला एनआयएने अटक केली होती. या कारवाईनंतर रियाझ काजीला मुंबई पोलिस दलातून निलंबित करण्यात आले होते. दरम्यान, त्यानंतर काही दिवसानी सचिन वाझे याला मुंबई पोलिस आयुक्तांनी सेवेतून बडतर्फ केले होते. तशीच कारवाई पोलिस आयुक्तांनी आता रियाझ काझीवर केली आहे. आयुक्तांनी आपल्या अधिकाराच्या वापर करीत 102 बॅचचा अधिकारी असलेल्या काझीला संविधानाच्या आर्टिकल 311 (2) (b) नुसार पोलिस सेवेतून बडतर्फ केले आहे. काझी एनआयएच्या चौकशीच्या फेयात सापडल्या नंतर त्याची गुन्हे शाखेतून सशस्त्र पोलिसा विभागात बदली करण्यात आली होती. त्याला अटक झाल्यानंतर तत्काळ निलंबित करण्यात आले.

























































