अद्भुत! सूर्याभोवती सप्तरंगी कडं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंगळुरूमध्ये सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आकाशात अद्भुत नजारा दिसला. नागरिकांना सूर्याभोवती सात रंगांचे गोलाकार कडं दिसलं. हे दृश्य इतकं मनमोहक होतं की ते कॅमेऱयात कैद करण्याचा मोह स्थानिकांना आवरला नाही. सोशल मीडियावर या दुर्मीळ दृश्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

सन हेलो खगोलीय घटना

वैज्ञानिक भाषेत या घटनेला ‘सन हेलो’ असे म्हणतात. ही आपल्या देशातील दुर्मीळ घटना असली तरी थंड हवामान असलेल्या देशांमध्ये ही एक सामान्य खगोलीय घटना आहे.

सूर्य जेव्हा 22 अंशात असतो त्या वेळी सिरस क्लाऊडमुळे (अतिशय पातळ थरांचे आद्रता असलेले ढग) गोलाकार कडं बनते. सूर्याची किरणे सिरस ढगांमध्ये असलेल्या हेक्सागोनल बर्फाच्या कणांच्या माध्यमातून परावर्तित होऊन ‘हेलो’ तयार होतो. या घटनेचा अंदाज वर्तवता येत नाही. 26 एप्रिल रोजी असाच नजारा झाशीमधील आकाशात दिसला होता.