बिबटय़ाची कातडी विकणारा गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक

बिबटय़ाच्या कातडय़ाची विक्री करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला खेरवाडी पोलिसांनी अटक केली. मनोज बडवे असे त्याचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 22 लाख रुपये किमतीची बिबटय़ाची कातडी जप्त केली आहे.

वांद्रे परिसरात एक जण बिबटय़ाची कातडी घेऊन येणार असल्याची माहिती खेरवाडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या माहितीची शहानिशा केली. सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संजय निकुंबे यांच्या पथकातील सुनील यटम, आशुतोष पाटील, सुदर्शन लोखंडे, तुषार जाधव, बाळू रुपवते यांनी सापळा रचला. सापळा रचून पोलिसांनी मनोजला ताब्यात घेतले. पोलिसांनी मनोजकडून बिबटय़ाचे कातडे जप्त केले.