चीनमध्ये आता तीन मुलांना जन्म देण्याची परवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवाजवी कुटुंब नियोजनामुळे चीनमध्ये युवा नागरिकांची संख्या घटल्याचा धसका चिनी सरकारने घेतला आहे. चीन हा म्हाताऱ्यांचा देश म्हणून गणला जाऊ नये यासाठी आता जिनपिंग सरकारने प्रत्येक दांपत्याला 3 मुले जन्मास घालण्याची परवानगी दिली आहे. लोकसंख्या वाढीस आळा बसून नव्या पिढीची लोकसंख्या घटू लागल्याने हा मोठा निर्णय चिनी सरकारला घ्यावा लागला आहे. त्यामुळे चीनने आता टू चाईल्ड धोरण रद्द करण्याची घोषणा केली आहे. गेल्या काही वर्षांत चीनमध्ये जन्मदर घटला आहे. तसेच वयोवृद्ध लोकांची संख्या वाढत असल्याचे एका अहवालातून समोर आले. वयोवृद्ध लोकसंख्येमुळे भविष्यात परिणाम जाणवतील, या भीतीने चीन सरकारने हा निर्णय घेतला आहे.