
पॅलेस्टाईन सध्या इस्रायलवर कंडोम बॉम्बने हल्ला करत आहे. इस्रायल आणि हमासमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर गाझा पट्टीत काही दहशतवादी इस्रायलच्या सीमा भागात दहशतवादी हल्ले करत आहेत. असे असले तरी इस्रायलने माणुसकीच्या नात्याने पॅलेस्टाईनला 10 लाख कोरोनाच्या लस देण्याचे जाहीर केले आहे. इस्रायल लवकरच पॅलेस्टाईनच्या अधिकार्यांना या लस सोपवणार आहेत.
इस्रायलने आतापर्यंत आपल्या देशात 85 टक्के नागरिकांना लस दिली आहे. परंतु देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील आणि गाजामध्ये राहणार्या पॅलेस्टाईन नागरिकांना लस न दिल्याने इस्रायलवर चौफेर टीका होत आहे. गरीब आणि गरजू देशांना लस पुरवण्याचा कार्यक्रम संयुक्त राष्ट्रसंघाने हाती घेतला आहे. या कार्यक्रमा अंतर्गत इस्रायल लवकरच पॅलेस्टाईनला कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा करणार आहे.
इस्रायलमध्ये नुकतेच नवीन सरकार स्थापन झाले आहे. या सरकाराने पॅलेस्टाईनला लस देण्याचे जाहीर केले आहे. पॅलेस्टाईलना फायजरच्या 10 लाख 20 हजार लसी देणार असल्याचे इस्रायलचे परराष्ट्र मंत्री येर लेपिड यांनी ट्विट करून सांगितले. या भागातील विकासासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू असेही लेपिड यांनी सांगितले.
कंडोम बॉम्ब म्हणजे काय?
पॅलेस्टाईनकडून इस्राईलमध्ये कंडोम बॉम्ब हल्ले केले जात आहे. त्यामुळे आगीच्या घटना घडत आहे. इस्रायल अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार फुगा, प्लॅस्टिक बॅग किंवा कंडोममध्ये स्फोटकांची उपकरणे टाकली जातात. नंतर हे बॉम्ब इस्रायलमध्ये फेकली जातात. या बॉम्बमुळे इस्रायलच्या दक्षिण भागात 400 ठिकाणी आगी लागल्या आहेत. अल अक्सा टीव्ही हे चॅनेल हमासच्या नियंत्रणाखाली काम करतं. या चॅनलने गाजामध्ये इस्रायलचे एक ड्रोन विमान पाडल्याचा दावा केला आहे. तसेच हमासने मशीनगनने इस्रायलवर गोळीबार केल्याचेही वृत्त आहे.




























































