
– शिवसेनेचा 55 वा वर्धापन दिन मुंबई शहर आणि उपनगरात मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ठिकठिकाणी समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले होते. मुंबईत सकाळपासून विविध शाखांमध्ये सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली होती. कुठे रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, तर कुठे कोविड लसीकरण पेंद्राचे उद्घाटन आयोजित करण्यात आले होते. कोरोनाच्या नियमांचे पालन करून या सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
– गेट वे ऑफ इंडियासमोरील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला शिवसेनेच्या वतीने दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी माजी नगरसेवक गणेश सानप, शाखाप्रमुख जयवंत नाईक, संतोष वीर आदी शिवसैनिक उपस्थित होते.
– शिवसेनेचे खासदार, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीदेखील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
– शिवसेना पक्षाच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना भवन येथे भगवा ध्वज फडकवला. याप्रसंगी शिवसेना नेते दिवाकर रावते, चंद्रकांत खैरे, शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, आमदार सदा सरवणकर, प्रवीण पंडित, माजी महापौर महादेव देवळे, श्रद्धा जाधव, यशवंत विचले.
– कुर्ला विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या प्रयत्नाने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समाज पेंद्र येथे मोफत स्वयंचलित ऑक्सिजन यंत्र सुविधाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त एम पश्चिम विभाग डॉ. पृथ्वीराज चव्हाण, डॉ. भूपेंद्र पाटील, संजना मुणगेकर, शाखाप्रमुख लहू भोर, प्रशांत कोकणे, दिलीप शिंदे, बळीराम उत्तेकर, संदीप गावडे आदी उपस्थित होते.
– शिवसेना पक्षाच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजी पार्क येथील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करताना शिवसेना नेते दिवाकर रावते, चंद्रकांत खैरे. सोबत शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, आमदार सदा सरवणकर, प्रवीण पंडित, माजी महापौर महादेव देवळे, श्रद्धा जाधव, शाखाप्रमुख यशवंत विचले उपस्थित होते.
– शिवसेना शाखा क्रमांक 60 आयोजित रक्तदान शिबिराला पोलीस अधिकाऱयांसह इच्छुक रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. स्थानिक शाखाप्रमुख सिद्धेश चाचे व आश्विनी खानविलकर यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी खासदार गजानन कीर्तिकर, शैलेश फणसे, बाळा आंबेरकर, राजेश शेटय़े, शीतल सावंत, जागृती भानजी, सतीश परब, बेबी पाटील, नंदू खानविलकर, दादासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते.
– विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली विभाग क्र. 2च्या वतीने ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले. यावेळी नगरसेविका शुभदा गुढेकर व शाखाप्रमुख निखिल गुढेकर, ‘पी उत्तर’ प्रभाग समिती अध्यक्षा संगीता सुतार, महिला विभाग संघटक मनाली चौकीदार, नगरसेवक शंकर हुंडारे, नगरसेविका गीता भंडारी, अॅड. कमलेश यादव, संतोष राणे, अनिल भोपी, नंदू मोरे, संतोष धनावडे आदी उपस्थित होते.































































