योग करा, फिट राहा; मराठी तारकांचा फिटनेस मंत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सकस आहारासोबत योगसाधनेची जोड मिळाली तर अनेक शारीरिक व्याधींपासून तुम्ही स्वत:ला दूर ठेऊ शकता. मराठी अभिनेत्रीदेखील फीट राहण्यासाठी आपल्या बिझी शेडय़ूलमधून आवर्जून वेळ काढत योगसाधना करतात. जागतिक योगा दिनानिमित्त अमृता खानविलकर, इशा केसकर, माधवी निमकर, सोनाली खरे आदी अभिनेत्रींनी विविध योगासने करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना ‘योग करा, फीट राहा’ असा संदेश दिला आहे.