‘डायरेक्ट सेलिंग’मध्ये पीजी डिप्लोमा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशन (आयजीएसए) आणि शूलिनी विद्यापीठाने एकत्र येत सोलन येथे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डायरेक्ट सेलिंग इन अॅकेडेमिक्स’ (सीईडीएसए) सुरू केले आहे. यामध्ये 2021-22 या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून डायरेक्ट सेल्समध्ये एक वर्षाचा पीजी डिप्लोमा असेल. डायरेक्ट सेल्ससाठी सीईडीएसए हे देशातील पहिले ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ असणार आहे. हिमाचल प्रदेश सरकारचे शिक्षणमंत्री गोविंदसिंह ठाकूर आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री राजिंदर गर्ग यांनी या केंद्राचे उद्घाटन केले. अॅकेडेमिक्समध्ये डायरेक्ट सेलिंगची सुरुवात केल्याने विद्यार्थ्यांना निश्चित आणि संशोधनावर आधारित शिक्षण मिळेल. त्यामुळे ते व्यवसायातील बारकावेदेखील शिकतील, असे ठाकूर म्हणाले. यावेळी आयडीएसएच्या अध्यक्षा रिनी सान्याल, शूलिनी विद्यापीठाचे उपाध्यक्ष प्रोफेसर अतुल खोसला उपस्थित होते.