लसीकरणात महाराष्ट्र कोटय़धीश! देशात नंबर वन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाविरुद्धचा लढा अधिक सक्षम करण्यासाठी राज्यात लसीकरण वेगाने सुरू आहे. लसीकरणात देशात नंबर वन असणाऱया महाराष्ट्राने आता आणखी एक मैलाचा दगड पार केला आहे. तीन कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस  देत महाराष्ट्र देशात सर्वाधिक लसीकरण करणारे पहिले राज्य ठरले आहे.

महाराष्ट्रात आज सायंकाळी 7 वाजेपर्यंत तीन कोटी दोन लाख 71 हजार 606 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देत हा विक्रम केला आहे. तर काल दिवसभरात राज्यातल्या पहिला डोस घेणाऱयांची संख्या दोन कोटी 39 लाख 93 हजार 590 होती तर दुसरा डोस घेणाऱयांची संख्या 57 लाख 30 हजार 47 इतकी होती. आज राज्यातल्या लस घेतलेल्या नागरिकांची संख्या तीन कोटींच्या वर पोहोचली आहे.

लसीकरण मोहिमेला गती

लसींचा पुरवठा केंद्र सरकारकडून पुन्हा होऊ लागल्यानंतर राज्याने 22 जून आणि 23 जून रोजी सलग दोन दिवस पाच लाखांवर लसीकरण केले होते. बुधवारी राज्यात 6 लाख 2 हजार 163 नागरिकांना लस देण्यात आली होती. आज राज्याने तीन कोटींचा आकडा पार केला आहे.

40 टक्के मुंबईकरांनी घेतला पहिला डोस

मुंबईत पालिकेच्या माध्यमातून कोरोना लसीकरण वेगाने सुरू असून आतापर्यंत 40 टक्के मुंबईकरांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये 24 जूनपर्यंत 39 लाख 20 हजार 384 जणांनी पहिला डोस, तर 9,39,154 जणांनी दुसरा डोसदेखील घेतला आहे. त्यामुळे कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपवण्यास मोठा हातभार लागणार असल्याचा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.

मुंबईत पालिका आणि सरकारच्या सुमारे 389 पेंद्रांवर वेगाने लसीकरण सुरू आहे. 21 जूनपासून लसीकरण मोहिमेला वेग आला असून दररोज सुमारे एक लाख डोस देण्यात येत आहेत. यामध्ये खासगी सोसायटय़ांनाही रुग्णालयांशी करार करून लसीकरणाची परवानगी दिल्यामुळे लसीकरणाचा वेग आणखी वाढला आहे. 18 वर्षे आणि त्याहून वयोगटातील व्यक्तींनी दुसरी मात्रा घेणाऱयांची टक्केवारी 10 टक्के एवढी आहे. मात्र, अजूनही सुमारे 47 लाख मुंबईकरांचे लसीकरण अद्याप शिल्लक आहे. दरम्यान, आवश्यक डोस मिळाल्यास पुढील दोन महिन्यांत 18 आणि त्यावरील वयोगातील सर्व व्यक्तींचे लसीकरण पूर्ण करू असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

18 वर्षांवरील लोकसंख्या 97 लाख

मुंबईची 18 आणि त्यावरील व्यक्तींची लोकसंख्या सुमारे 97 लाख आहे. लसीकरण मोहिमेचा वेग कायम राहिल्यास त्या सर्वांचे लसीकरण 2 महिन्यात पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. संपूर्ण देशभरात 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. सुरुवातीला डॉक्टर, आरोग्यदूत, फ्रँटलाइन कर्मचाऱयांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर, 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटासह दीर्घ आजाराने त्रस्त असलेल्यांना लस देण्यात आली.

चिंताजनक – डेल्टा प्लसचा पहिला बळी रत्नागिरीत

रत्नागिरीत डेल्टा प्लसचे नऊ रुग्ण आढळले होते. राज्यात सर्वाधिक रुग्ण सापडल्यामुळे जिह्यातील ज्या गावांत हे रुग्ण आढळले तिथे निर्बंध कडक करण्यात आले होते. राज्यात सापडलेल्या 21 डेल्टा प्लस रुग्णांपैकी रत्नागिरीतील 80 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. संगमेश्वर येथील या महिलेला अन्य व्याधीही होत्या. सध्या राज्यात डेल्टा प्लसचे 20 रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दिलासादायक – कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन डेल्टावर प्रभावी

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींचा वापर सध्या देशात करण्यात येत आहे. या दोन्ही लसी सर्व प्रकारच्या व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचे आयसीएमआरचे डायरेक्टर जनरल बलराम भार्गव यांनी स्पष्ट केले आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन SARS CoV 2 अल्फा, बीटा, गामा तसेच डेल्टाच्या रूपांविरुद्ध काम करत आहेत, असे भार्गव म्हणाले.