
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी राज्यपाल जगदीप धनखड यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. धनखड हे एक भ्रष्ट व्यक्ती आहेत. 1996 मधील हवाला जैन प्रकरणाच्या आरोपपत्रात त्यांचे नाव होते. या भ्रष्टाचारी माणसाला पेंद्र सरकारने राज्यपाल बनवलेच कसे? असा खडा सवाल करीत ममता बॅनर्जींनी धनखड यांच्या उत्तर बंगालच्या दौऱयामागील हेतूवर शंका उपस्थित केली आहे.
राज्यपाल धनखड यांनी नुकताच उत्तर बंगालचा केलेला दौरा राजकीय स्टंट होता. त्या दौऱयात त्यांनी केवळ भाजपच्या आमदार-खासदारांची भेट घेतली. त्यांनी अचानक उत्तर बंगालचा दौरा का केला? यामागे उत्तर बंगालच्या फाळणीचे कारस्थान असल्याचा मला संशय येत आहे, असा आरोप ममता बॅनर्जींनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना केला. त्यांनी धनखड यांना पश्चिम बंगालच्या राज्यपालपदावरून हटवण्यासाठी पेंद्र सरकारला वारंवार पत्रे लिहिली आहेत. संविधानाला अनुसरून मी राज्यपालांना भेटेन, त्यांच्याशी बोलेन, सर्व शिष्टाचार पाळेन. पण पेंद्र सरकारने माझ्या पत्रांना अनुसरून कार्यवाही केली पाहिजे, अशी ठाम भूमिकाही त्यांनी सोमवारी मांडली.


























































