
फिलीपाईन्समध्ये एक सैन्याचे विमान कोसळले आहे. या अपघातात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. हे विमान 92 सैनिकांन घेऊन कागायन डी ओरो सिटीहून निघाले होते. परंतु या विमानाला अचानक आग लागली आणि कोसळले. असे असले तरी या अपघातातून 40 जणांना वाचवण्यात यश आले आहे.
At least 17 killed and 15 rescued from the burning wreckage of Philippine’s C-130 military plane crash: AFP
— ANI (@ANI) July 4, 2021
सैन्याचे C-130 हे विमान कागायन डी ओरो शहरातून निघाले. तेव्हा विमानात 92 सैनिक उपस्थित होते. नंतर हे विमान सुलु प्रांतातील जोलो बेटावर उतरत होते तेव्हा विमानाला आग लागली आणि ते कोसळले. कोसळल्यानंतर विमानाला भीषण आग लागली. या अपघातात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 40 जणांना वाचवण्यात यश आल आहे. जमखींना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.




























































