चार जणींसोबत घरोबा… 53 तरुणींसोबत लग्नाची बोलणी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियाद्वारे तरुणींना भुरळ पाडून ओळख वाढवीत त्यांच्या नातलग तरुणांना लष्करात भरती करण्याच्या आमिषाने तब्बल 57 जणींना गंडा घालणाऱया दादल्याला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने चार जणींसोबत घरोबा करून आर्थिक लूट करून तब्बल 53 तरुणींसोबत लग्नाच्या आमिषाने बोलणी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आतापर्यंत त्याने 53 लाखांची फसवणूक केली आहे.

योगेश दत्तू गायकवाड (रा. कन्नड, संभाजीनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका तरुणीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

असा करीत होता फसवणूक

हा योगेश मूळचा कन्नड तालुक्यातील असून पुण्यातील विविध भागांत तो फिरत होता. बसस्थानकावर एकटय़ा तरुणींना गाठून विश्वास वाढवून मोबाईल नंबर घेत होता. त्याशिवाय सोशल मीडिया, विविध अॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामद्वारे ओळख वाढवून तरुणींना लग्नाचे आमिष दाखवित होता. त्यांच्या कुटुंबातील मुलाला लष्करात भरती करण्याच्या आमिषाने 2 ते 3 लाख रुपये घेऊन पोबारा करीत होता. अशा प्रकारे त्याने 4 जणींसोबत घरोबा करून आर्थिक गंडा घातला आहे. त्याशिवाय 53 जणींसोबत प्रेमाचे नाटक करून त्यांच्याकडून प्रत्येकी 1 लाख रुपये घेऊन फसवूणक केली आहे.