प्रथमेश बी.टेकच्या चार वर्षात तो प्रथम आला असून त्याचा सीपीआय स्कोअर 10 पैकी 9.1 इतका आला आहे. या यशामुळे त्याची आय.आय.टी.चेन्नई येथे एम.टेक. एरोस्पेस या अभ्यासक्रमासाठी थेट निवड झाली आहे. या यशस्वी वाटचालीत त्याला प्रा.अनिल अवस्थी, प्रा.कन्हैया चौधरी, प्रा.मुकुंद काशीद, प्रा.दत्ता भालसिंग, प्रा.संदीप दिक्षीत, प्रा.मंदार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
अभ्यासाबरोबरच खेळातही प्रथमेश अग्रेसर आहे. वयाच्या अडीच वर्षांपासून त्याने स्पीड स्केटिंग क्रीडा प्रकार आत्मसात करायला सुरूवात करत त्यात नैपुण्य मिळविले. 6 वर्षांचा असताना त्याने स्पीड स्केटिंगमध्ये बेल्जियमला झालेल्या स्पर्धेत हिंदुस्थानचे प्रतिनिधीत्त्व करीत उत्तम कामगिरी केली होती. क्रीडा प्रकारात त्याला 87 सुवर्णपदकांसह एकूण 134 पदके मिळालेली आहे. याशिवाय 47 ट्रॉफीही त्याने मिळवल्या आहेत. फुटबॉल, बास्केटबॉलमध्ये गती असलेल्या प्रथमेशला गिटार वाजविण्याचाही छंद आहे. अभ्यासातही तो सुरूवातीपासून नेहमीच अव्वल दहावीपर्यंतचे त्याचे शिक्षण नगरमध्ये आर्मी पब्लिक स्कूलमध्ये झाले आहे. दहावीला सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत तो टॉप टेनमध्ये आला होता. 2015-16 या वर्षात आय.आय.टी.मुंबई आयोजित गणित ऑलिंपियाडमध्ये तो पहिला आला होता.
अकरावी, बारावी त्याने पेमराज सारडा महाविद्यालयात केले. बारावीनंतरच्या जेईई परीक्षेत त्याने नगर जिल्ह्यात प्रथम येण्याची कामगिरी केली होती. शिवाय जेईई अॅडव्हान्स परीक्षेतही त्याने उल्लेखनीय यश मिळविण्याची कामगिरी केली. यानंतर आय.आय.टी.मुंबईला ( गोवा डिवीजन ) त्याची बी.टेक. मेकॅनिकल अभ्यासक्रमासाठी निवड झाली. याकाळात त्याने अनेक बीटीपी प्रोजेक्ट केले. हुशारी आणि कौशल्याच्या बळावर त्याने बी.टेक प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत आता एम.टेक अभ्यासक्रमाकडे वाटचाल केली आहे. खेळ, अभ्यास, छंद यासाठी त्याला आई सौ.सीमा गांधी (संचालिका, द्रोणा ऍकॅडमी) व वडील निर्मल गांधी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले आहे. या यशाबद्दल प्रथमेशचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.































































