
महाराष्ट्र सरकाराने नियुक्त केलेल्या चौकशी आयोगाद्वारे भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा जबाब नोंदवण्यात येईल. शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यात त्यांनी कोरेगाव-भीमाबद्दल काही माहिती दिली होती. त्यानंतर शरद पवार यांचा जबाब नोंदवण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आली होती.
1 जानेवारी 2018 रोजी भीमा-कोरेगाव येथे हिंसाचार घडला होता. त्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या आयोगाचे कामकाज 2 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. हिंसाचारप्रकरणी पुणे पोलिसांनी नऊ कार्यकर्त्यांना अटक केली होती. पुणे पोलिसांच्या कारवाईची चौकशी करण्यासाठी एसआयटी नियुक्तीची मागणी पवारांनी केली होती.
2 ऑगस्टपासून साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात येतील व शरद पवार यांनाही समन्स बजावले जाईल, असे चौकशी आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी सांगितले.
























































