1300 कोटींची संपत्ती अन् 90 कोटींचे आलिशान घर, लक्झरी लाईफ जगतो हा दाक्षिणात्य ‘सुपरस्टार’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरण तेजा आपल्या नवीन घरामुळे सध्या चर्चेत आहे. रामचरण याने हैदराबादमध्ये एक आलिशान घर खरेदी केली केले आहे. हैदरबादमधील जुबली हिल्सवर असणाऱ्या या घराची किंमत जवळपास 90 कोटी रुपयांच्या घरात आहे. रामचरणने घेतलेले हे नवीन घर 25 हजार स्क्वेअर फूटचे असून एखाद्या महालापेक्षा कमी नाही.

सुपरस्टार चिरंजीवीचा मुलगा असलेला रामचरण तेजा याच्या स्टायलिश लूकची आणि लक्झरी लाईफची चर्चा सोशल मीडियावर नेहमीच सुरु असते. रामचरणकडे एस्टन मार्टिनसारखी लक्झरी कारही असून अनेक आलिशान घरंही आहेत. त्याने नुकतेच घेतलेले घर महालापेक्षा कमी नसून या बंगल्याच्या बेसमेंटमध्ये एक मंदिरही आहे. या मंदिराचे डिझाईन जुन्या काळातील मैदिरासारखे करण्यात आले आहे. तसेच या बंगल्यात स्विंमिग पूल, टेनिस कोर्ट, जिम यासरख्या सुविधाही आहेत.

रामचरण याचा 2018 मध्ये आलेला ‘रंग्स्थला’ (Ram Charan movie Rangasthalam) हा चित्रपट सुपरहिट झाला होता. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत बाहुबलीला देखील मागे टाकले होते, अशी चर्चा दाक्षिणात्य इंडस्ट्रीत सुरू होती.

दरम्यान, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये रामचरण याचे नाणे खणखणीत चालत आहे. या बळावर त्याने जवळपास 1300 कोटी रुपयांची संपत्ती कमावली असल्याचे बोलले जाते. या सुपरस्टार अभिनेत्याने अपोलो रुग्णालयाचे एक्झिक्यूटिव्ह चेअरमन प्रताप सी रेड्डी यांची नात उपासना हिच्यासोबत विवाह केला आहे.