रत्नागिरीत पावसाचे पुनरागमन; दिवसभर संततधार सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने पुन्हा ज़ोर धरला आहे. रविवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. पावसामुळे रत्नागिरी शहरातील रस्ते चिखलमय झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाने पुनरागमन केले. पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत होता. मात्र, पाऊस सुरू होताच शेतकऱ्यानी आनंद व्यक्त केला आहे. गेल्या 24 तासात 342 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गुहागर मध्ये 72 मिमी,रत्नागिरी 51 मिमी,संगमेश्वर 41 मिमी,राजापूरमध्ये 40 मिमी आणि लांजामध्ये 39 मिमी पावसाची नोंद झाली आहे.रत्नागिरी शहरात नळपाणी योजनेमुळे मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आल्याने पाऊस सुरू होताच रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य दिसत आहे.