प्रसिद्ध क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचे माजी फंलदाज यशपाल शर्मा यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शर्मा यांच्या कुटुंबीयांनी याबाबत माहिती दिली आहे. ते 66 वर्षांचे होते. 1983 चा विश्वविजेत्या हिंदुस्थानी संघातील ते महत्त्वाचे फलंदाज होते.

यशपाल शर्मा यांनी 42 एकदिवसीय व 37 कसोटी सामने खेळले आहेत. 1979 ते 1983 दरम्यान ते टीम इंडियाच्या मधल्या फळीतले महत्त्वाचे फलंदाज होते. ते काही वर्ष बीसीसीआयच्या निवड समितीवर देखील होते. 1983 च्या विश्वचषकात टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा करणारे ते दुसरे खेळाडू होते. त्यांनी 37 कसोटी सामन्यात 1606 धावा केल्या होत्या. तर 42 एकदिवसीय सामन्यात 883 धावा केलेल्या.

1983च्या विश्वचषकात केलेली जबरदस्त फलंदाजी

1983 च्या विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यातच टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा पराभव केला होता. त्या विजयाचे पूर्ण श्रेय यशपाल शर्मा यांचे होते. टीम इंडियाच्ा तीन विकेटवर 76 धावा असताना यशपाल शर्मा मैदानावर आलेले. त्यानंतर त्यांनी 120 चेंडूत 89 धावा केल्या. त्यांची ही धावसंख्या टीम इंड़ियाला विजयापर्यंत घेऊन गेली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरोधात 40, इंग्लंडविरोधात 61 असे सातत्याने ते चांगले खेळत राहिले.